तुळजापूर प्रतिनिधी
पुणे येथील उद्योजक विनायक वैजिनाथ रुकारी यांनी रविवारी श्री तुळजाभवानी मातेस तीन तोळे सोने.एक लाख अकरा हजार रुपयाचा धनादेश व पैठणी महावस्त्र अर्पण केले.
पुजारी अमोल ताकमोघे यांनी त्यांची तुळजाभवानी मातेस महापूजा आरती केली. पूजेनंतर रुकारी कुटुंबाने देवीचे मनोभावे दर्शन घेतले श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने रूकारी परिवाराचा देविची प्रतिमा महावस्ञ देवुन यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी मंदिर संस्थांचे धार्मिक व्यवस्थापकीय विश्वास कदम, संकेत वाघे, प्रविण अमृतराव, सातपुते, पुजारी अमोल ताकमोघे आणि पत्रकार गुरुनाथ बडुरे उपस्थितीत होते.
