छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सोनेरी कलर देण्याची राष्ट्रवादीची मागणी

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

तुळजापूर तिर्थक्षेत्री असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काळा कलर बदलून शिवनेरी कलर देण्यात यावा नाही बदलल्यास राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस ने शुक्रवार दि. १० रोजी मुख्याधिकारी यांना निवेदन दिला आहे.

उस्मानाबाद व सोलापूर येथे सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे उभे केलेले असून या पुतळ्यांना सोनेरी कलर देण्यात आलेला आहे याच धर्तीवर तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सोनेरी कलर देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिल्या गेलेल्या पुतळ्याचा कलर हा काळा असून तो निषेधार्थ कलर आहे यामुळे तुळजापूर शहरात व शहरातील शिवप्रेमी भक्तांच्या भावना दुखावल्या जात असून याबाबत आपण गांभीर्य पूरक लक्ष घालून छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारी जयंतीच्या अगोदर पुतळ्याला सोनेरी कलर देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आलेली आहे याबाबत गांभीर्यपूर्वक दखल न घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुळजापूर तीव्र आंदोलन छेडला जाईल असा इशारा गोकुळ तात्या शिंदे यांनी दिला आहे या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका संघटक व प्रसिद्धीप्रमुख बबन गावडे युवा नेते महेश चोपदार, सुभाष अग्रवाल, खंडोजी जाधव, फिरोज पठाण, दत्ता तेलंग, सुधीर पुरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top