तुळजापूर प्रतिनिधी
पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभो व महाराष्ट्रातील शिवसेनेची सत्ता पुन्हा एकदा महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हाती येऊ व उद्याचा चिन्हाचा निकाल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा लागो यासाठी आई तुळजाभवानी ला शिवसेना महाराष्ट्राच्या उपनेते सुषमाताई अंधारे यांनी दर्शन घेत साकडे घातले.
बीड जिल्ह्यातील हजारो शिवसैनिक बीड ते तुळजापूर पायी दिंडी काढून आई तुळजाभवानीच्या मंदिरात शिवसेना उपनेते सुषमाताई अंधारे यांनी दिंडीचे स्वागत करून आई तुळजाभवानीला साकडे घातले यावेळेस युवा सेना विस्तारक शरद कोळी, महिला आयोगाच्या सदस्य ऍड संगीताताई चव्हाण, शिवसेना उस्मानाबाद महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई वडने पवार, शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख सुरेखाताई मुळे, बीडचे माजी आमदार सुनील दादा धांडे साहेब तसेच बीड जिल्हा प्रमुख अनिल दादा जगताप बीड जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब मामा अंभोरे आप्पासाहेब जाधव शुभम डाके रत्नाकर आप्पा शेख फरजन बीडचे शिवसेना तालुकाप्रमुख बीडचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक इत्यादी आणि तुळजापूर तालुक्यातील शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाम पवार शिवसेना उपतालुका प्रमुख प्रदीप मगर सुनील जाधव तुळजापूर उपशहर प्रमुख बाळासाहेब शिंदे बापूसाहेब नाईकवाडी अर्जुन आप्पा साळुंखे युवा सेनेचे सागर इंगळे व विद्यार्थिनीचे उपजिल्हाप्रमुख पिनू भोसले माजी विभाग प्रमुख लालासाहेब देवकर विभाग प्रमुख महेंद्र सुरवसे बाळासाहेब फडके दिनेश रसाळ व तुळजापूर तालुक्यातील व बीड जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
