उस्मानाबाद प्रतिनिधी
पत्रकार शशिकांत वारीसे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा देण्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांना इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन उस्मानाबाद जिल्ह्याच्या वतीने ईमेलद्वारे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनामध्ये असे सांगण्यात आले आहे की, राजापूर जिल्हा रत्नागिरी येथील दैनिक महानगरी टाइम्सचे पत्रकार शशिकांत वारीसे यांनी रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथे होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या संदर्भात दैनिक महानगरी टाइम्स मध्ये एक बातमी प्रसारित केली होती त्या बातमीचा मनात राग धरून रिफायनरी समर्थन समितीचे पंढरीनाथ आंबेरकर यांनी पत्रकार शशिकांत वारीसे यांचा अपघात घडवून जिवंत ठार मारल्याची घटना घडली आहे.
त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने आरोपीस अटक करण्यात आले असून त्याच्यावर ३०२ चा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. त्या आरोपीची सखोल चौकशी करून या प्रकरणात अजून कोण आहेत का? याची चौकशी करून त्यांच्यावर पण कठोर कारवाई करण्यात यावी व जलद गतीने चौकशी करून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी उस्मानाबाद जिल्हा इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात येत आहे.
यापुढे पत्रकारांवर असे हल्ले होऊ नये यासाठी शासनाच्या वतीने पत्रकार यांना संरक्षण देण्याचा कायदा बनवावा. जर पुढील काळामध्ये असे पत्रकारांवर हल्ले झाल्यास त्यांना शासनाच्या वतीने कोणतेही मदत मिळत नाही त्यामुळे आमची विनंती आहे की आपण शासनाच्या वतीने पत्रकारांना विमा कवच देण्यात यावे.
तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारीसे यांच्यावर हल्ला करणाऱ्याचा आम्ही इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करत आहोत.
हे निवेदन इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष जुबेर शेख, प्रदेश उपाध्यक्ष फिरोज पठाण, संजय नाना शितोळे, जिल्हा उपाध्यक्ष अहमद अन्सारी, जिल्हा महासचिव राम थोरात, जिल्हा संघटक मनोज जाधव यांच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथी शिंदे यांना ई-मेल द्वारे पाठवण्यात आलेले आहेत.
