तुळजापूर प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेशअध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा ग्रामीण रुग्णालय तुळजापूर येथे फळे व बिस्कीट वाटप करण्यात आले. यावेळी एकशे पन्नास महिलांचे ई श्रम कार्ड काढण्यात आले. यावेळी भाजपा महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मिनाताई सोमाजी यांनी प्रास्ताविक केले यावेळी भाजपाचे मराठवाडा जैन प्रकोष्ट गुलचंद भाऊ व्यव्हारे भाजपा तालूका युवा सरचिटणीस सागर पारडे सारीक छत्रे मिरा परीट दिव्या छत्रे उपस्थित होते. त्यांनंतर ईश्रम कार्ड रजिस्ट्रेशन तसेच यावेळी दोनशे पासष्ट गरीब व गरजू महिलांना मोफत साडी वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपाचे गुलचंद भाऊ व्यव्हारे भाजपा तालूका अध्यक्ष आनंद दादा कंदले तुळजापूर शहर अध्यक्ष राजेश भैय्या कदम सागर पारडे सारीका छत्रे भाजपा जिल्हा उपाध्यक्षा अंजली बेताळे अनिता तोडकर कोमल भिसे सायली पाटील सुलताना शेख काजल शेख साक्षी गिडवाणी उपस्थित होते.प्रास्ताविक भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मीनाताई सोमाजी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उषा धाकतोडे यांनी केले.
