डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने महास्वच्छता अभियान

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने दि.०१ मार्च २०२३ रोजी वार बुधवार रोजी सकाळी ७ वाजता महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून संपूर्ण तुळजापूर शहरामध्ये महास्वच्छता अभियान आयोजित केले आहे.

या महास्वच्छता अभियानात तुळजापूर शहरासह सांगवी, माळूब्रा, सुरतगांव, सावरगाव व काटी या गावातून एकूण ५०० ते ७०० श्री सदस्य सहभागी होणार आहेत. तुळजापूर सह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दि.१ मार्च २०२३ रोजी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये तुळजापूर शहरामध्ये श्री तुळजाभवानी मंदिर परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, नगर परिषद परिसर, पोलीस स्टेशन परिसर, पावणारा गणपती परिसर स्वछता करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top