आनंदाचा शिधा वेळेवर मिळेल का यंदा

mhcitynews
0


सिद्दीक पटेल

येत्या पाडव्याला आणि १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला सरकारकडून पुन्हा आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे. गेल्या वेळी आनंदाचा शिधा दिवाळी संपून ही काही ठिकाणी भेटलाच न्हवता तर काही ठिकाणी दोन ते तीनच वस्तू उपलब्ध झाले होते त्याचप्रमाणे यंदाचा तरी आनंदाचा शिधा वेळेवर मिळेल का यंदा ही 'पहिले पाडे पंच्चावन्न' प्रमाणे तापाचे ठरू नये, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे.

राज्यातील गोरगरीब जनतेची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने आनंदाचा शिधा या योजनेंतर्गत रेशनकार्ड धारकांना 100 रुपयांत 1 किलो साखर, 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ व 1 लिटर पामतेल वस्तू देण्याचा निर्णय घेतला. राज्यभरात याचे वाटप झाले. आतापर्यंत लाखो लोकांनी याचा लाभ घेतला आहे. मात्र काही ठिकाणी वाटपात अडचणी येत असल्याचे समोर आलेच आहे. तर काही ठिकाणी त्या किटमध्ये एखादी वस्तू कमी तर आनंदाच्या शिध्यातून मिळणाऱ्या तेलाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याच्या अनेक नागरिकांच्या तक्रारी होत्या. नियोजनाच्या अभावी गत वेळीकाही ठिकाणी शिधा मिळालाच नाही. अशी वेळ पुन्हा येऊ नये अशी अपेक्षा  नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top