तुळजापूर प्रतिनिधी
आझाद बहुउद्देशीय सामाजिक संस्था तुळजापूर यांच्या वतीने उमरा यात्रेच्या निमित्ताने इन्नुस शेख यांचा सत्कार दि. 3 रोजी युवा नेते विनोद (पिंटू) गंगणे, मुफ्ती फिरदोस पठाण, मौलाना गुलाम मोहम्मद रजवी, मौलाना रजा बिलाल, मौलाना इब्राहिम पटवेकर, नगरसेवक पंडित जगदाळे, औदुंबर कदम, किशोर साठे, रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले, नरेश अमृतराव, आजित परमेश्वर, नाना लोढे , उस्मानाबादचे मा. नगराध्यक्ष मैनुद्दीन पठाण, अंबरीश जाधव, राजेश्वर कदम यांच्या हस्ते करण्यात आला. सदर दि. 15 रोजी उमरा यात्रेला रवाना करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर सिंदफळ, तामवाडी, काटी, काक्रंबा, ताकविकी, लोहारा, नळदृर्ग, बारूळ, मंगरूळ, अपसिंगा, उस्मानाबाद, या ग्रुपच्या हस्ते इन्नुस शेख यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर तुळजापूर मुस्लिम बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. आझाद बहुउद्देशीय सामाजिक संस्थाचे सभासद मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परिसरातील अत्यंत गरीब कुटुंबातील ज्यांच्याकडे उमरा करण्याची इच्छा आहे परंतु आर्थिक परिस्थिती भक्कम नाही अश्या व्यक्तीची संघटनेच्या व मित्र परिवाराच्या सोबतीने येणाऱ्या काळात हा उपक्रम दरवर्षी राबविणार.
मोहसीन बागवान, आझाद बहुउद्देशीय सामाजिक संस्था
