श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या श्रीशैल गमन यात्रा महोत्सवाची सांगता

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा श्रीशैल गमन यात्रा सोहळा 2023, निमित्त दिनांक 6 फेब्रुवारीस सकाळी 11 वाजता शंकराचार्य श्री सच्चीदानंद अभिनव विद्यानृसिंह भारती स्वामी महाराज संकेश्वर - करवीर पीठ, जिल्हा बेळगाव कर्नाटक यांच्या हस्ते श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज नंदी नामास दिलेल्या मूळ शक्तीयुक्त गुरू पादुकास रुद्र मंत्राचा अभिषेक करण्यात आला व शंकराचार्य यांची रथातून भव्य शोभयात्रा काढण्यात आली सादर शोभयात्रेमध्ये संभाजीनगर येथील श्रीकृष्ण गुरुकुल वेद पाठशाळेतील वे.मू. अनिरुद्ध देशमुख व त्यांचे विद्यार्थी सह, हरी कुलकर्णी, हरी राजज्ञे बार्शी, महेश भोरे बदलापूर, प्रभाकर गोडशे, पार्थ गोडशे नाशिक, प्रसन्ना कुलकर्णी मुंबई, यांच्या मंत्रोच्चारात काढण्यात आली व दुपारी 1 वा. शंकराचार्य स्वामीची मंत्रोक्त पाद्य पूजा करण्यात आली यावेळी असंख्य दत्त भक्तांची उपस्थिती होती.

सदरील कार्यक्रमाचे आयोजन श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे चार शिष्यापैकी तुळजापूर येथील नंदी नामा होते या नंदी नामांचे 14 वे वंशज धर्मभूषण नागेशशास्त्री नंदिबुवा अंबुलगे व कुटुंबियांनी केले होते. औरंगाबाद येथील श्री गजेंद्र वाढोणकर यांनी तांदळाच्या दाण्यावर श्री गुरुचरित्र ४५ व्या अध्यायाचे लिखाण केले असून या पवित्र ग्रंथाचे अनावरण पूज्य श्री शंकराचार्य यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी उस्मानाबाद जिल्ह्याचे एस पी श्री अतुल कुलकर्णी, तुळजापूरचे पी आय श्री काशीद,भालचंद्र पाठक, शशिकांत कऱ्हाडे, शिवशंकर भारती,अशोक देशमुख,पंडित खजिनदार,,तसेच औरंगाबाद , नागपूर, पुणे, सोलापूर ,लातूर, उस्मानाबाद ,परांडा, बार्शी येथील भावीक भक्तांची व स्थानीक महिलाची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top