मंगरूळ येथील ग्रामदैवत कंचेश्वर यात्रेस शनिवार पासून प्रारंभ

mhcitynews
0

धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे भरगच्च आयोजन

प्रतिनिधी चांदसाहेब शेख

तुळजापूर तालुक्यातील मौजे मंगरूळ येथील ग्रामदैवत कंचेश्वर यात्रेस शनिवार १८ फेब्रुवारी रोजी प्रारंभ होत असून यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे भरगच्च आयोजन करण्यात आले आहे.

रुढी परंपरेनुसार ग्रामदैवत कंचेश्वर यात्रा महोत्सव महाशिवरात्रीस साजरी करण्यात येणार आहे यामध्ये प्रामुख्याने शनिवार १८ फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजता श्री कंचेश्वरास विधिपूर्वक अभिषेक व वाद्यवृंदाच्या निनादात श्रींच्या काठीची स्थापना व सकाळी अकरा ते दुपारी तीन पर्यंत उपवासाच्या पदार्थांचे प्रसाद वाटप तसेच रात्री नऊ ते अकरा यावेळेत हभप शितलताई सुरनुर यांचे कीर्तन दुसऱ्या दिवशी रविवार १९ फेब्रुवारी रोजी नऊ ते तीन यावेळेत गावातील भजनी मंडळ यांचे भजन सायंकाळी चार ते सात यावेळेत श्रींच्या काठीची व पालखीची अश्वासह ,  बँडपथक , फटाक्यांच्या आतषबाजीत भव्यदिव्य मिरवणूक रात्री नऊ ते अकरा यावेळेत हभप रुक्मिणीताई हावरे यांचे कीर्तन व रात्री अकरा पासून  शोभेच्या फटाक्यांच्या आतषबाजीत छबिना मिरवणूक तिसऱ्या दिवशी सोमवार २० फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप चौथ्या दिवशी मंगळवार २१फेब्रुवारी रोजी रात्री ७ पासून गावातील जिल्हा परिषद प्राथमिक , माध्यमिक व इंदिरा कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक व गुणदर्शन कार्यक्रम आयोजित केला आहे.

या सर्व कार्यक्रमाचा लाभ मंगरूळ व  परिसरातील नागरिकांनी  घेऊन आनंद द्विगुणित करावा  असे आव्हान  कंचेश्वर यात्रा महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top