तुळजापूर प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रभर होत असलेला शरद युवा संवाद यात्रा श्री क्षेत्र तुळजापूर येथे येत असून.
यामध्ये प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख व युवक प्रदेशचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर शरद युवा संवाद यात्रा निमित्त शहर राष्ट्रवादी तर्फे बाईक रॅलीचे आयोजन केले असून सकाळी 10:00 वाजता उस्मानाबाद रोड, उड्डाणपूल येथून ते पुजारी मंडळ मंगल कार्यालय, तुळजापुर या मार्गे होणार असून बाईक रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित राहणार असून यामध्ये जास्तीत जास्त राष्ट्रवादी पप्रेमीनी उपस्थित राहावे असे आव्हान शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे करण्यात आले आहे.
.jpeg)