तुळजापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून संपूर्ण तुळजापूर शहरामध्ये बुधवार दि.1 मार्च रोजी महास्वच्छता अभियान आयोजित केले होते.
या महास्वच्छता अभियानात तुळजापूर शहरासह सांगवी, माळूब्रा, सुरतगांव, सावरगाव व काटी या गावातून एकूण ५०० ते ७०० श्री सदस्य सहभागी झाले. यामध्ये तुळजापूर शहरामध्ये श्री तुळजाभवानी मंदिर परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, नगर परिषद परिसर, पोलीस स्टेशन परिसर, तहसील कार्यालय परिसरा सह शहरातील प्रमुख रस्ते स्वछता करण्यात आले.
सर्व श्री सदस्यांनी मास्क हंडग्लोज खोरे टोपली कोयते पोते व तळवते ही सर्व लागणारे स्वच्छतेचे साहित्य सोबत आणले होते. कचरा वाहतूक करण्यासाठी 5 ट्रॅक्टर 5 घंटागाडी 1 छोटा हत्ती व 1 डम्पिंग प्लेजर चा वापर करण्यात आलं घंटागाडी व ट्रॅक्टरचा पुरवठा नगरपरिषद तर्फे करण्यात आला होता यावेळी एकूण अंदाजे 25 टन कचऱ्याची डम्पिंग ग्राउंड येथे विल्हेवाट करण्यात आली.
