तुळजापूर प्रतिनिधी
शहरातील मरियम पटेल व आयशा बागन या चिमुकल्यानीं उन्हाचा पारा चढत अस्तांनी देखील अश्या भर उन्हाच्या पाऱ्यात वयाच्या सहाव्या आणि आठव्या वर्षी आपला पहिला रोजा पूर्ण केला.
इस्लाम धर्माच्या पवित्र रमजान महिन्याला सुरुवात होऊन 3 दिवस पूर्ण झाले असून या पवित्र महिन्यात मुस्लिम धर्मातील लहान-मोठे स्त्री-पुरुष महिनाभर रोजा (उपवास) ठेऊन ईश्वराची प्रार्थना करतात व पाच वेळा नमाज पठण करून पवित्र ग्रंथ कुराणचा वाचन करत जकात अदा करून अल्लाह कडे संपूर्ण जगातील मानव जातीला सुख प्राप्त होवो सर्वांची मनोकामना पूर्ण होवो सर्वांना चांगले आरोग्य लाभो अशी दुवा प्रार्थना अल्लाहकडे करतात.
घरातील मोठ्यांचे अनुकरण करत मरियम व आयशा या लहान चिमुकल्यानी तब्बल चौदा तास विना अन्न पाणी राहून काटेकोरपणे पूर्ण रोजा पूर्ण केल्याबद्दल तिचे पटेल परिवारसह, नातेवाईक त्यांचे फूलहार घालून कौतुक केले.
