सिटी न्यूज टीम
गत दोन वर्षापासून कोरोना या आजाराने सामान्य जणांचे जगणे असहय्य केले होते. त्याचाच परिणाम म्हणून बाजारपेठांमध्ये आता मंदीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या मंदीचा फटका सर्वच स्तरातील व्यापारपेठांना बसत आहे.
फेब्रुवारी – मार्च या महिन्यांमध्ये दहावी व बारावी बोर्ड परीक्षा असल्यामुळे बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतो. परंतु शैक्षणिक साहित्य खरेदीच्या बाजारपेठांमध्ये बऱ्यापैकी उलाढाल होत असते. परंतु या घडीला या बाजारपेठा देखील ओस पडत आहेत. शैक्षणिक वस्तूंच्या किंमती सर्वसामन्यांच्या खिश्याला परवडणाऱ्या नाहीत.
हिडनबर्ग चा अदाणी समूहाबाबतचा रिपोर्टमुळे शेअर बाजारामध्ये बऱ्यापैकी घसरण दिसून आली. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना याचा फटका सहन करावा लागला.
नुकत्याच वाढलेल्या घरगुती वापराच्या व व्यावसायिक वापराच्या गॅस किमतींनी सामान्य जणांचे कंबरडे मोडले आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेचे लाभार्थी आता जळणफाटा शोधत रानोराणी फिरताना दिसत आहेत. देशामध्ये चालू असलेले राजकीय हेवेदावे आणि स्वतःच्या पद श्रेष्ठत्वासाठी चाललेली परवड आता जनसामन्यांच्या जिव्हारी येत आहे. एकंदरीत उन्हाच्या आणि मंदीच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे.

