महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळामुळे समाजातील नव उद्योजकांना अर्थसहाय्य मिळण्यासाठी मदत

mhcitynews
0


लिंगायत संघर्ष समिती कडून स्वागत 

तुळजापूर प्रतिनिधी 

गुरुवारी विधानसभेत शासनातर्फे अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे. व राज्याचे अर्थमंत्री या नात्याने अर्थसंकल्प मांडत असताना उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी वीरशैव लिंगायत समाजातील तरुण सुशिक्षित बेरोजगार नव उद्योजकांना अर्थसहाय्य देण्यासाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली होती व चालू वर्षासाठी या महामंडळाला 50 कोटी रुपये देण्याचे घोषित करून समाजाला न्याय दिला आहे.

मागील अनेक वर्षापासून लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्राच्या वतीने सातत्याने माजी मंत्री आ.विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आ.मनोहर पटवारी, समन्वयक काकासाहेब कोयटे, अध्यक्ष सुनिल रुकारी, उपाध्यक्ष राजाभाऊ मुंडे, राज्य संघटक गुरुनाथ बडुरे, प्रदीप साखरे, भगवान कोठावळे आदी पदाधिकाऱ्यांसह समाजाच्या विविध मागण्या साठी पाठपुरावा सुरू होता. प्रलंबित असलेल्या विविध मागण्यापैकी गुरुवारी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची मागणी पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे समितीने आभार मानले.

राज्यातील सर्व समाज बांधवाना ओबीसीचे आरक्षण सरसकट मिळण्यासाठी शुद्धिपत्रक काढण्यात यावे. मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर यांचे राष्ट्रीय स्मारकाचे काम लवकर सुरू व्हावे यासाठी समितीच्या वतीने पाठपुरावा सुरू असल्याचे राज्य संघटक बडुरे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top