सारा गौरव येथे महिला दिनानिमित्त दंततपासणी शिबिर

mhcitynews
0

तुळजापुर प्रतिनिधी 

जागतिक महिला दिनानिमित  बुधवारी  सारा गौरव येथील यादव क्लिनिकमध्ये अमित सोशल अँड रिसर्च सेंटरच्यावतीने महिला दिनाचे औचित्य साधून महिलासाठी मोफत दंतरोग तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उदघाटन मुख्याध्यापिका करूणा यादव यांच्याहस्ते झाले. महिला दिनाचे औचित्य साधून डॉ. प्रियांका सोनवणे यांचा अमित सोशल फाउंडेशनच्या वतीने मुख्याध्यापिका यादव यांनी त्यांचा सत्कार केला. शिबिरात दंततज्ञ डॉ. प्रियंका सोनवणे यांनी ३५ महिलांची दंततपासणी केली. यासाठी डॉ. रामेश्वर यादव यांनी सहकार्य केले. यावेळी आबासाहेब कापसे ,सुरेखा जांभळे ,स्वाती साळुंके इ.जणासह महिला उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top