तुळजापूर प्रतिनिधी
मौजे आपसिंगा येथील ग्रामपंचात चे दि. 01 एप्रिल 2019 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीचे लेखा तपासणी होणे बाबत बुधवार दि 9 मार्च रोजी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांना अनिकेत बाळु सगरे रा. आपसिंगा यांनी पत्रद्वारे मागणी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ग्रामपंचायत कार्यालय आपसिंगा येथे नमुद केलेल्या कालावधीत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे. या प्रकरणी वारंवार माहिती मागितली असता सदरील माहिती देण्यास टाळाटाळ होत आहे सदरील कार्यालय मार्फत ग्रामपंचायत कार्यालय आपसिंगा येथील सखोल लेखी परिक्षण / लेखा तपासणी होणे गरजेचे असून प्रकरणी तात्काळ मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सुचित करून तपासणी अधिकत्या मार्फत तपासणी व्हावी व गैरव्यवहार आढळल्यास ताबडतोब उपहार झालेल्या रकमेची वसुली करून संबंधीतावर गुन्हे दाखल करण्याची पत्राद्वारे सगरे यांनी मागणी केली आहे

