उद्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले जिल्हा दौ-यावर

mhcitynews
0


उस्मानाबाद प्रतिनिधी 

पँथर नेते दिवंगत यशपाल सरवदे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ)पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा  केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (दि.१०)मार्च २०२३ रोजी  उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. यशपाल सरवदे यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर भिम नगर  क्रांती चौकात शोकसभा होणार आहे. या सभेला सर्व जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओहाळ यांनी केले आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे स्वीय सहायक प्रवीण मोरे यांनी प्रसिद्ध केलेल्या दौरा कार्यक्रमानुसार, केंद्रीय राज्यमंत्री, शुक्रवारी सकाळी मुंबई येथून औरंगाबाद येथे हवाई मार्गे येणार आहेत. औरंगाबाद येथून बीड मार्गे दुपारी दीड वाजता उस्मानाबाद येथील सर्किट हाऊस येथे त्यांचे आगमन होईल.

 यानंतर सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांची ते आढावा बैठक घेणार आहेत. आढावा बैठकीनंतर लगेच दुपारी 2 वाजता पत्रकार परिषदेला ते संबोधित करतील. तीन वाजता पिंपळदरी येथे भेट देणार आहेत. दुपारी पाच वाजता भिम नगर येथील  क्रांती चौकात आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत शोकसभा होणार आहे. त्यापूर्वी ते दिवंगत यशपाल सरवदे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top