नेहरू युवा केंद्र व नवनिर्मिती प्रेरणा बहुउद्देशीय महिला मंडळ आयोजित युवा महोत्सव उत्साहात साजरा

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद भारत सरकार नवनिर्मिती प्रेरणा बहुउद्देशीय महिला मंडळ सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने तुळजापूर येथे दि 8 मार्च जागतिक महिला दिन तसेच युवा महोत्सव अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा त्याचबरोबर हस्तकला विक्री प्रदर्शन तसेच आरोग्य तपासणी शिबिर व महिलांसाठी पाककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन श्री तुळजाभवानीच्या प्रतिमेचे पूजन जिल्ह्याचे खासदार आदरणीय ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक धनंजय काळे साहेब भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस रामचंद्र कुलकर्णी साहेब कल्याण सागर समूहाच्या सचिव प्रज्ञा कुलकर्णी तुळजापूरच्या माझी नगराध्यक्ष अर्चनाताई गंगणे भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे संस्थापक प्रदीप बाबा खंडापुरे पाटील आबा कापसे गणेश पाटील प्रशांत अपराध सुधीर कदम अॅड पी डी देशमुख साहेब यांच्या हस्ते विजेत्या सन्मानित करण्यात आले.

सांस्कृतिक कार्यक्रम प्रथम क्रमांक गार्गी कावरे द्वितीय क्रमांक अंजली जाधव तृतीय क्रमांक माधुरी शिंदे ग्रुप डान्स प्रथम क्रमांक बंजारा डान्स द्वितीय क्रमांक स्मार्ट लुक गर्ल तृतीय क्रमांक स्मार्ट लुक अंजली जाधव पाककला स्पर्धा प्रथम क्रमांक अंबिका साखरे द्वितीय क्रमांक रेणुका शिंदे तृतीय क्रमांक अंकिता पाठक उत्तेजनार्थ समता पाठक विजेत्या स्पर्धकांना सन्मान चिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आले बक्षीसाचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा संस्थापक मीनाताई सोमाजी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उषा धाकतोडे यांनी केले व पंधरा स्टॉलचे प्रदर्शन भरवण्यात आले त्यामध्ये खाद्यपदार्थ लेडीज वेअर पर्स बॅग कापडी पिशव्या मसाले चटणी असे सर्व प्रकारचे स्टॉल उपलब्ध करण्यात आले होते व त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालय तुळजापूर शुगर बीपी चेकअप करण्यात आले यासाठी डॉक्टर मलबा मॅडम समुपदेशक हिरेमट मॅडम यांनी आरोग्य शिबिर संपन्न केले त्याचबरोबर नवनिर्मिती प्रेरणा महिला मंडळअध्यक्ष भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य मीनाताई सोमाजी भाजपाचे तालुका युवा सरचिटणीस सागर पारडे शहराध्यक्ष राम चोपदार महेंद्र कावरे रूपाली घाडगे, संध्या खुर्द, श्रीदेवी वेदपाठक सुवर्णा उमाप अरुणा कावरे अपर्णा बर्दापूरकर अक्षदा राऊत सुनिता काळे कोमल पाटील नेहरू युवा केंद्राचे लेखा अधिकारी नाना पाटील व सहकारी वैभव लांडगे, रविकांत सुरवसे ,सुनीता वाकळे, पुरुषोत्तम बेले, प्रदीप साठे, रुपेश उमरदंड ,भक्ती शिराळे इत्यादींच्या सहकारी यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top