सत्यजित साठे काक्रंबा प्रतिनिधी
छत्रपती संभाजीराजे स्थापित स्वराज्य संघटनेची तुळजापूर तालुका कार्यकारणीची निवड शुक्रवार दिनांक १७ रोजी येथील नवीन शासकीय विश्रामगृहात होणार आहे. स्वराज्य संघटनेत काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी याबैठकीस उपस्थित राहावे. ज्याशिवप्रेमी नागरिकांना छत्रपती संभाजीराजे व त्यांच्या स्वराज्य संघटनेवरप्रेम आहे अशांनी या तालुका कार्यकारणी निवडीच्या उपस्थित राहावे असे आव्हान संघटनेचे महेश गवळी, जीवनराजे इंगळे, आबासाहेब कापसे, कुमार टोले यांनी केले आहे.
