मराठवाड्याची कन्या सारिका यांनी भरवले पुण्यात साहित्य संमेलन

mhcitynews
0


स्पंदन फाऊंडेशन पुणे चे दुसरे साहित्यप्रेमी संमेलन आळंदी येथे संपन्न


शिराढोण प्रतिनिधी 

स्पंदन साहित्य,कला,क्रीडा, चॅरिटेबल फाउंडेशन पुणे आयोजित दुसरे साहित्यप्रेमी संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडले. उद्घाटनाच्या पहिल्या सत्रात निवेदिका-वसुंधरा शर्मा सोलापूर, यांनी आपल्या सुंदर निवेदनाने कार्यक्रमाची उंची वाढवली.

प्रस्ताविकेतून सारिका माकोडे-भड यांनी सुनिल नाना पानसरे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. संमेलनाचे अध्यक्ष मा. श्री हनुमंत चांदगुडे गझल आणि कविता साहित्याचे एकच प्रवाह आहेत. असे प्रतिपादन करत असताना ज्ञानेश्वर आणि तुकारारामांच्या मुक्काम शेवटी एकाच ठिकाणी होतो असा सुंदर दाखला दिला. तर संमेलन उद्घाटक सागर काकडे म्हणाले,मराठवाड्यातील सारिका माकोडे-भड या कन्येने साहित्यिक, सांस्कृतिक वारसा एक शैक्षणिक वेगळा दर्जा असलेल्या पुणे शहरात वेगवेगळ्या विचार प्रवाहानां एक संघ करण्याचं काम या संमेलनाच्या माध्यमातून घडवून आणलं आहे. मा. मसूद पटेल सर यांनी गझलचे विविध पैलू उलगडले.मा. महेंद्र कुमार गायकवाड, आणि हभप.श्रीहरी रेड्डी महाराज यांनी संत साहित्य आणि ओव्यांचे दाखले देत वातावरण खिळवून ठेवले.या उद्घाटन सत्रा दरम्यान "कै.सुनील नाना पानसरे स्मरणार्थ स्पंदन गझल गौरव पुरस्कार २०२३" मा. दिनेश भोसले पुणे यांना, स्पंदन साहित्य गौरव पुरस्कार २०२३ ,मा.स्वाती पाटील कर्जत यांना, स्पंदन क्रीडा गौरव पुरस्कार २०२३ मा. दादासो सत्रे बारामती यांना तर स्पंदन कला गौरव पुरस्कार मा. राजकुमार कुंभार कळंब यांना प्रदान करून गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला मा. सविता इंगळे, मा. विनोद आष्टूळ, मा. जितेन सोनवणे, मा. दत्ता गुरव मा. हृदय मानव अशोक, मा. बबन धुमाळ,गोपाल मापारी, गजानन मते, प्रशांत पोरे,यांच्यासवे महाराष्ट्रातील दिग्गज साहित्यिकांच्या विशेष उपस्थितीत उद्घाटन सत्र संपन्न झाले.

दुसऱ्या सत्रामध्ये निवेदक या.विश्वनाथ साठे तर मा.अनिल दीक्षित-सुप्रसिद्ध हास्य कवी यांच्या अध्यक्षतेखाली "मनोरंजनातून प्रबोधनाकडे" हे रंगतदार कविसंमेलन झाले. कवी. सुरज अंगुले, शुभांगी पाटील,अनिल कदम,अनिल नाटेकर,सुप्रिया लिमये, सोमनाथ सुतार,कविता काळे, चंद्रकांत जोगदंड सविता इंगळे,शोभा जोशी यांनी बहारदार रचना सादर केल्या. तिसऱ्या सत्रात गझल मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. निवेदिका- निलोफर फनीबंद यांनी सुंदर निवेदन केले तर या गझल मुशायऱ्याचे अध्यक्ष माननीय शेखर गिरी यांची सात वाजल्यानंतर ही गझल भाव खाऊन गेली. सहभागी गझलकार मा. दिनेश भोसले, कालिदास चौडेकर,ज्योती शिंदे, सरोज चौधरी, संदीप जाधव मारुती वाघमारे, निखिल सुक्रे, आदेश कोळेकर यांनी बहारदार गझला सादर करून रसिकांची मने जिंकली. स्पंदन साहित्य,कला, क्रीडा चॅरिटेबल फाउंडेशन पुणे या संस्थेच्या संस्थापिका मा.सारिका माकोडे भड, परशुराम लडकत-उपाध्यक्ष, डॉ. शुभा लोंढे-कोषाध्यक्ष मा- . हर्षदा सुनील नाना पानसरे-सल्लागार, रमेश जाधव-सहकार्याध्यक्ष,. सुनिता काटम-सहसचिव,लक्ष्मण शिंदे -सल्लागार,आनंद गायकवाड- कार्याध्यक्ष, सचिन काळे-सचिव डॉ.मदन देगावकर- सल्लागार,ऋषिकांत भोसले-सदस्य,मा. दर्शन जोशी-प्रसिद्धीप्रमुख . या सर्वांनी परिश्रम घेतले. शेवटी ऋषिकांत भोसले यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top