प्रतिनिधी चांदसाहेब शेख
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगरूळ ता. तुळजापूर येथील सहशिक्षिका तथा प्रभारी मुख्याध्यापिका सविता महारुद्र हेरकर यांना मंगरूळ बिटस्तरीय आदर्श शिक्षिका सावित्री- ज्योतिबा फुले पुरस्काराने गौरविण्यात आले.
बुधवार 26 एप्रिल रोजी यमगरवाडी विद्या संकुलात आयोजित दिमाखदार सोहळ्यात त्यांना फेटा , शाल , श्रीफळ , पुष्पहार व सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले शाळेचा व विद्यार्थ्यांचा दर्जा त्यांच्या कार्यकाळात सुधारल्याने तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याने व विविध नाविन्यपूर्ण शालेय उपक्रम राबवल्याने त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे हे तर प्रमुख उपस्थितीत तुळजापूर गट शिक्षणाधिकारी इनामदार मॅडम , प्राचार्य डॉ जटगुरे सर , विस्तार अधिकारी मल्हारी माने सर , केंद्रप्रमुख वाले सर यांची उपस्थिती होती यावेळी मंगरूळ बिटमधील मुख्याध्यापक , शिक्षक , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हेरकर मॅडम यांच्या कार्याला साजेसा हा पुरस्कार मिळाल्याने शाळा व्यवस्थापन समितीने पुरस्कारासाठी नियुक्त समितीचे आभार व्यक्त केले. त्यांना पुरस्कार मिळाल्याने मंगरूळ व परिसरातील शिक्षणप्रेमी नागरिकांतुन अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
