तुळजापूर प्रतिनिधी
तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या निवडणुकीत 18 जागेपैकी भाजपने 14 जागा जिंकून परत एकदा बाजार समितीवर आपला झेंडा फडकला. शनिवार दिनांक 29 रोजी तुळजाभवानी अभियांत्रिकी स्पोर्ट्स क्लब हॉल मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी एम. आर.अंबीलपूरे व सहाय्यक निवडणूक अधिकारी कुलकर्णी यांच्या उपस्थितीत सकाळी नऊ वाजता मतमोजणी सुरुवात झाली. सुरुवातीस हमाल मतदारसंघा तील निकाल भाजपच्या बाजूने गेला तर ग्रामपंचायत मतदार संघातील निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने गेले सोसायटी मतदारसंघात क्रॉस वोटिंग झाल्यामुळे निकालास वेळ लागला यामध्ये अखेर भाजपने बाजीमारत आपला गड कायम राखला.
भाजपचे आमदार राणा जगदीशसिंह पाटील यांच्या मार्गदर्शना खाली तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती भाजपने 18 ते 18 जागेवर आपले उमेदवार उभे केले होते त्यापैकी सोसायटीत 11 पैकी 11 तर व्यापारी 2 पैकी 2 तर हमाल मतदारसंघात 1 उमेदवार निवडून आला. तर ग्रामपंचायत मतदार संघात सर्व 4 पैकी 4 जागा महाविकास आघाडीने जिंकून भाजपला एक प्रकारचा धक्का दिला आहे. तालुक्यातील ग्रामपंचायती वर महाविकास आघाडीचे वर्चस्व असल्याचे निकालातून स्पष्ट दिसून आले. निकाल लागल्यावर भाजप व शिवसेना शिंदे गट कार्यकर्त्यांनी शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पाटील यांच संपर्क कार्यालय येथे एकच जल्लोष केला.
