शिराढोन गावात पाणी टंचाई ग्रामस्थांनी दिला घागर मोर्च्याचा इशारा

mhcitynews
0

शिराढोन प्रतिनिधी 

कळंब तालुक्यातील शिराढोन येथे मागील होणाऱ्या दोन महिने पाणी टंचाई मूळे ग्रामस्थांनी ग्राम विकास अधिकाऱ्यांना निवेदन देत २ मे रोजी घागर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

शिराढोन हे गाव तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकसंख्येचे गाव म्हणून ओळखले जाते पण अश्या या गावात लोकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. गावात बरेच जलस्रोत आहेत त्यात पाच बोरवेल दोन विहिरी आणि धनेगाव डॅम वरून आलेले अर्धा इंच पाईप लाइन गावाची तळ्यालगत स्वतःच्या मालकीची विहीर आणि 100 के व्ही चा एक्सप्रेस फिडर चा विधुत सप्लाय सुद्धा आहे फक्त पाइप लाईन अभावी गावास पाण्या साठी मुकावे लागते या साठी ग्राम पंचायत कार्या लयाने प्रयत्न करणे गरजेचे आहे मागील दोन महिन्या पासूम पाण्याची समस्या उद्भवत असून ग्राम पंचायत चा हलगर्जीपणा यात दिसून येत आहे यामुळे जनतेतून नाराजीचे सूर दिसून येत आहे. असे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. यावेळी आयुब कुरेशी, सलमान शेख बडे ,निलेश नाईकवाडे, अमोल नाईकवाडे, एजाज डांगे, अमर पाटील, बाशीद शेख, दादा खतीब, हणमंत गाडे उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top