तुळजापूर प्रतिनिधी
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौरा केला दौऱ्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी आई तुळजाभवानी मातेचे विधीवत पूजाआरती करून भवानी मातेचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी
अवकाळी पाऊस, गारपीट सारख्या संकटकाळात तुळजाभवानी माता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहा आणि शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येऊ दे असे साकडे घालून मुख्यमंत्र्यांनी शेतकाऱ्यांवरील अवकाळी पावसाचे अरिष्ट आणि इतर संकटे दूर करावीत, हीच मागणी आई तुळजाभवानी कडे केली. यावेळी आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत, तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील,बाळासाहेबांची शिवसेना तालुका अध्यक्ष संभाजीराजे पलंगे, पुजारी संकेत पाटील, नंदू गंगणे, दिलीपनाना मगर, प्रशांत गंगणे,आदींची उपस्थिती होती.
