स्वराज्य संघटना लोहारा तालुका कार्यकारणी जाहीर तालुका अध्यक्षपदी प्रशांत थोरात तर कार्यअध्यक्षपदी साळुंके

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

स्वराज्य प्रमुख श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांच्या संकल्पनेतून स्वराज्य घडविण्यासाठी गाव तिथे शाखा घर तिथे स्वराज्य संकल्पनेतून बुधवार दि.19 रोजी लोहारा येथे स्वराज्य संघटना तालुका कार्यकारिणी निवडी स्वराज्य संघटना उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष श्री महेश गवळी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.

यामध्ये लोहारा तालुका अध्यक्षपदी प्रशांत थोरात तालुका सचिवपदी बळी गोरे, कार्यअध्यक्षपदी युवराज साळुंके तर शहर संघटक शंभू वाले, तालुका संघटक संजय मुटे, प्रसिद्ध प्रमुखपदी ओमकार चौघुले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर कार्यकारी सदस्य म्हणून वैभव पवार यांची निवड करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष महेश गवळी, औदुंबर जमदाडे, सत्यजित साठे, रोहन देशमुख, ज्ञानेश्वर घोगरे सह शिवभक्तांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top