तुळजापूर प्रतिनिधी
तिर्थक्षेञ तुळजापूर येथे उपमाहिती कार्यालय कार्यान्वीत करण्याची मागणी शहरातील पत्रकारांनी राज्याचे उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस श्री तुळजाभवानी दर्शनार्थ आले असता श्री तुळजाभवानी मंदीरात निवेदन देवुन केली , या बाबतीत सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली.
तिर्थक्षेञ तुळजापूर येथे उपमाहिती कार्यालय यापूर्वी राज्य सरकारने मंजूर केलेले होते. राज्य सरकारने सदरचे उपमाहिती कार्यालय येथे कार्यान्वीत झालेले होते, त्यानंतर उपमाहिती कार्यालय बंद करण्यात आलेले आहे. वास्तविक पाहता उपमाहिती कार्यालय येथे कार्यान्वीत असल्यास प्रशासनाची सोय होणार आहे. तसेच तुळजापूर शहरातील प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीची सोय होणार आहे. तुळजाभवानी देवस्थान समितीच्या धर्मशाळेत उपमाहिती कार्यालय सुरु होते ही वस्तुस्थिती आहे.
वास्तविक पाहता धाराशिव जिल्हा माहिती अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली तुळजापूरचे उपमाहिती कार्यालय कार्यान्वीत होते. सदरचे उपमाहिती कार्यालय सुरु केल्यास अनेक गैरसोयी टळणार आहेत. तसेच प्रशासनाची सोय होणार आहे. उपमाहिती कार्यालयाच्या मागणीचा आपण सहानुभुतीपुर्वक विचार करावा व सबब उपमाहिती कार्यालय कार्यालय पुन्हा कार्यान्वीत करावे, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन पञकार संघाचे जिल्हाउपाअध्यक्ष श्रीकांत कदम अँड जगदीश कुलकर्णी संजय खुरुद सचिन ताकमोघे अजित चंदनशिवे गोविंद खुरुद सतिश महामुनी सतिश फत्तेपूरे ज्ञानेश्वर गवळी शुभम कदम प्रदीप अमृतराव सिध्दीकी पटेल अमीर शेख फोटोग्राफर सतिश पवार अदिसह पञकार यावेळी उपस्थितीत होते.
