तुळजापूर प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापुर येथे शुक्रवारी आले असता आ, राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत ना. फडणवीस यांना महात्मा बसवेश्वर सामाजिक संस्थेच्या वतीने अध्यक्ष गुरूनाथ बडुरे यांनी त्यांना निवेदन दिले, नळदुर्ग येथील नियोजित श्री महात्मा बसवेश्वर पुतळ्यास वन विभागाची 10 एकर जागा उपलब्ध करून देण्याची व निधी मंजूर करण्याची मागणी केली, तसेच 2014 साली समाजास ओबीसी आरक्षण देण्यात आले पण काही तांत्रिक बाबी मुळे आजही राज्यात लाखो समाज बांधव या ओबीसी आरक्षण मिळण्यापासून वंचित आहेत त्यात दुरुस्ती करून शुध्दीपत्रक काढण्यात यावे , आर्थिक महामंडळ स्थापना करून निधी देण्यात यावी, मंगळवेढा येथील श्री महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकाचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी केली, यावेळी लक्ष्मण उळेकर, बाबा घोंगते,भारत कोप्पा उपस्थित होते.
