तुळजापुर प्रतिनिधी
आषाढी एकादशी निमित्त मुक्तांगण इंग्लिश मिडीयम स्कूल येथे शाळेतील चिमुकल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीची वारकरी दिंडी काढण्यात आली होती. यात नर्सरी पासून ते इयत्ता सहावी पर्यंत विद्यार्थ्यांनी या पालखी दिंडीत सहभाग नोंदविला.
प्रारंभी मुख्याध्यापिका विशाखा पाटील यांच्या हस्ते पालखी दिंडीचे विधिवत पूजन करून श्रीफळ फोडन्यात आला. यानंतर खांद्यावरी विठ्ठला-रुखमाई ची पालखी हाती भगवा झेंडा - टाळ व मुखी विठ्ठलाचे नाव अशा स्वरूपात बालगोपाळांनी दिंडी काढली होती. सदरची पालखी दिंडी उस्मानाबाद महामार्ग ते मुक्तांगण प्रशाला या मार्गावर काढण्यात आली होती. या पालखी दिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. पालखी दिंडी सोहळ्याचा केळी प्रसाद वाटपाने समारोप करण्यात आला. यासाठी मुख्याध्यापिका विशाखा पाटील, राहुल जेटीथोर तसेच शाळेतील सर्व शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
