प्रतिनिधी बिलाल कुरेशी
पवनराजे मल्टिस्टेट मुख्य शाखेच्या वतीने जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त तालुका प्रमुख सतिशकुमार सोमानी व उस्मानाबाद शहर प्रमुख सोमनाथ गुरव यांच्या हस्ते कै श्री पवनराजे निंबाळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अन्नछञ उस्मानाबाद येथे अन्नदान करण्यात आले. यावेळी संस्थेचे CEO श्री. मुखीम सिद्धिकी सर व जनरल मॅनेजर विश्वजित देशमुख व लोन HOD सुरज महाडिक पतसंस्थेचे ब्रँच मॅनेजर ज्ञानेश्वर भोसले सर व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.
अपसिंगा येथे शिव अल्पसंख्यांक सेनेचे जिल्हाप्रमुख अमीर शेख यांच्यावतीने खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जवळपास 200 विद्यार्थ्यांना वही / पेन/ चॉकलेट वाटप करण्यात आले.
यावेळी दीपक थोरात, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत डांगे, दीपक सोनवणे ,नरसिंग पाटील, ग्रामपंचायत सदस्या सौ रतनबाई गुलाबराव जाधव, ग्रामपंचायत सदस्य सुशांत रोकडे, विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन नागेश कोल्हे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश बामणे ,गोपाळ गोरे ,गुणवंत क्षिरसागर, प्रवीण क्षिरसागर, मिटू राऊत ,वैजनाथ शिंदे ,माजी ग्रामपंचायत सदस्य सौदागर गोरे, विकास डांगे, शंकर गिरी ,रवी रोकडे, मुख्याध्यापक पाटील सर, यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
