तुळजापूर प्रतिनिधी
बागवान सामाजिक बहुउद्देशीय संस्था तुळजापूर व जनाब हाजीसाब बागवान परिवाराच्यावतीने शनिवार दि. 15 जुलै रोजी स्वगृही ईद-ए-मिलन समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमास शहरातील सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, शैक्षणिक, क्षेत्रातील मान्यवर व पत्रकारांची उपस्थिती होती. ईद मिलन समारोहामध्ये शीरखुर्मा सह विविध प्रकारच्या मिष्ठांन पदार्थाचा आस्वाद उपस्थितानी घेतला.
प्रसंगी शहरातील शिवजी रोचकरी यांनी एल एल बी कायद्याची पदवी प्राप्त केल्या बद्दल तसेच मुस्लिम समाजातील प्रतिकूल परिस्थितीतुन दहावी परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल विदयार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल पुष्पगुछ देऊन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले. यावेळी येत्या काळात शहरातील प्रत्येक वार्डात गुणवंत विध्यार्थ्यांचा अश्याच प्रकारे संघटने तर्फे सत्कार करून प्रोत्साहित करावे असे मत आनंद मुळे यांनी व्यक्त केले.
यावेळी पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंखे, मा. नगरसेवक पंडितराव जगदाळे, रणजित इंगळे, नरेशकाका अमृतराव, आनंद जगताप, काकासाहेब शिंदे, जेष्ठ नागरिक हाजी रसूल बागवान, माजी नगराध्यक्ष मैनूद्दीन पठाण,युसूफ शेख, हज्जुमिया अत्तार, आरिफ बागवान, हाजी गौस बागवान, मतीन बागवान, मोहसीन बागवान, तोफीक शेख, मकसूद शेख, अशपाक शेख आदी बांधव उपस्थित होते.
