तुळजापूर प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी महेंद्र धुरगुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते पक्ष कार्यालयात येथे करण्यात आली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आमदार विक्रम काळे व प्रा. सुरेश बिराजदार आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
धुरगुडे हे माजी जिल्हा परिषद सदस्य असुन त्यांनी दोन्ही वेळा वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटातून विजयी झाले असून ग्रामीण भागात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. जिल्हा परिषदेत त्यांनी अनेक विषय आक्रमक व अभ्यासपुर्ण मार्गी लावले आहेत.
