काक्रंबा आरोग्य उपकेंद्राची सुविधांचा अभाव

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

तालुक्यातील काक्रंबा येथील आरोग्य उपकेंद्राची झालेली दुरावस्था व सुविधे अभावी सामान्य जनतेला उपचारा अभावी होणारी हेळसांड बाबत काक्रंबा स्वराज्य शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना शुक्रवार दि. 21 रोजी तक्रारीचे निवेदन देण्यात आले.

दिलेल्या तक्रारी निवेदनात  नमूद केले आहे की,  काक्रबा गावातील आरोग्य उपकेंद्राची अतिशय दयानीय अवस्था झाली असून . मंजूर असलेल्या पदावरी व्यक्ती वैद्यकीय कर्तव्यावर उपस्थित नसतात, इमारतीची पडझड झाली असून स्थानिक गोर गरीब जनतेला उपचारासाठी तुळजापूर येथे जावे लागत असून रात्रीच्या अडचणीच्या काळात काक्रंबा उपकेंद्र रात्र पाळी साठी स्वतंत्र वैद्यकीय डॉक्टरची व्यवस्था करण्याची प्रमुख मागणी यावेळी केली आहे. निवेदनावर सत्यजित साठे, ज्ञानेश्वर घोगरे, काक्रंबा शाखाप्रमुख सारंग कानडे, सागर कानडे आदी उपस्थित होते.



 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top