तुळजापूर प्रतिनिधी
एस पी शुगर चे अध्यक्ष सुरेश बापू पाटील साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्याबद्दल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुळजापूरच्या वतीने येथील पापणास रोड सर्किट हाऊस येथे दि.26 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस तुळजापूर विधानसभा मतदार संघाच्या वतीने तुळजापूर विधानसभा अध्यक्ष गोकुळ तात्या शिंदे व युवा नेते महेश चोपदार विजय सरडे यांच्या हस्ते सुरेश बापू पाटील यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी सुरेश बापू पाटील, गोकुळ तात्या शिंदे,विजय सरडे, शफी भाई शेख, महेश चोपदार, विकी घुगे, बसवराज मसुदे, दिगंबर खराडे,बबनराव गावडे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या सत्कार समारंभ प्रसंगी नळदुर्ग चे माजी नगराध्यक्ष शफी भाई शेख माजी उपसभापती दिगंबर खराडे विधानसभा उपाध्यक्ष बसवराज मसुदे भागवत शिरसागर मीडिया प्रमुख बबन गावडे युवक शहराध्यक्ष नितीन आबा रोचकरी ग्रामपंचायत सदस्य व युवा नेते मनोज माडजे ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष विकी घुगे शहर उपाध्यक्ष अनमोल शिंदे अभय माने अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष फिरोज पठाण दिलीप नवगिरे चांगदेव देवकर विकास डांगे विकास हावळे समाधान रोकडे नागेश कोल्हे सुरज पवार महेश शिंदे भैरू लांडगे दत्ता निचळ बाबासाहेब जाधव विकास खंडाळकर लिंबराज मोटे तालुक्यातील पदाधिकारी व ककार्यकर्ते उपस्थित होते.
