डॉ. बाबासाहेब आंबडेकर पूर्णाकृत पुतळ्याचे काम लवकर व्हावे

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

तुळजापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुर्णाकृत पुतळयाच्या कामात दिरंगाई होत असले बाबत बुधवार दि.26 रोजी तुळजापूर येथील समस्त भीमसैनिकांच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात नमूद केली आहे की, तुळजापूर शहरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुर्णांकृती पुतळा व सुशोभीकरण चे काम गेले बऱ्याच वर्षा पासुन मंजुर झाले असुन या कामाचे भुमीपुजन सोहळा दिनांक 12 नोव्हेंबर 2022 रोजी झाले आहे. प्रत्यक्ष कामात सुरुवात जानेवारी 2023 रोजी पासुन झाली आहे. पुर्णांकृती पुतळा व सुशोभीकरणाचे काम हे तुळजापूर विकास प्राधिकरणातुन केले जाणारे काम गुत्तेदार यांच्याकडुन सातत्याने काम बंद ठेवुन कामास दिरंगाई केली जात आहे. सदर काम हे निवेदा प्रक्रियेत 10 महिन्याच्या आत पुर्ण करण्याची अट असताना देखील कामात दिरंगाई होत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचा पुर्णाकृती पुतळा हा समस्त तुळजापूर वासियांची अस्मीता असुन हे काम तातडीने सुरु व्हावे व काम करत असताना काम दर्जेदार व्हावे व या कामाचे मटेरिअल चांगल्या प्रतिचे वापरावे तसेच कामात दिरंगाई होणार नाही याकडे प्रशासनाने स्वत: लक्ष घालावे व येत्या 06 डिसेंबर महापरी निर्वांण दिनाच्या च्या आत पुर्णांकृती पुतळा व सुशोभीकरण करणे काम पुर्ण करुन लवकरात लवकर भव्य अनावरण करावे अन्यथा समस्त भिमसैनिकांच्या वतीने अंदोलन करण्यात येईल असे म्हंटले आहे. निवेदनावर सागर कदम यांच्या सह लक्ष्मण कदम, कुणाल रोंगे,विनोद भालेकर, अनिकेत सोनवणे, नितीन माने,सुधीर सोनवणे, आप्पा कदम, रोहित कदम, रोहित पांडागळे या भीम सैनिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top