तुळजापूर प्रतिनिधी
तुळजापूर शहर व परिसरात गेल्या महिन्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. सतत होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिक असुरक्षित झाले आहेत. थोडं ही बाहेर गेले की चोरी होते अशी धारणा व धास्ती मनात बसली आहे. अगदी बाजारात जाताना देखील चार वेळा विचार करावा लागतो असे मत एका नागरिकाने व्यक्त केले आहे. अत्यंत कष्टाने निर्माण केलेल्या आपल्या संसारातील वस्तू चोरटा काही क्षणात लंपास करतो आणि वर चोरी झाल्या नंतर केस करा, गुन्हा दाखल करा आणि न्यायासाठी वर्षानुवर्षे वाट पाहत बसा..चोर मिळाला तर वस्तू मिळणार अन्यथा नाही..त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
दुष्काळजन्य परिस्थिती आल्याने काही दिवसापासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे तुळजापूर शहरातील एस टी कॉलिनी परिसरात महिलेला मारहाण करून दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. पाच ते सहा चोराच्या टोळीने हातात हत्यार घेत एका घरात घुसण्याचा प्रयत्न करीत असेलेला व्हिडीओ सर्वत्र फिरत आहेत. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण होवून नागरिक चिंतागस्त झाले आहेत. रात्रीची गस्त घालणारे पोलीस नेमके काय करतात ? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. पोलिसांनी रात्रगस्त वाढवून अशा घटनांना आळा घातला पाहिजे, अशी मागणी होत आहे.
नागरिकांनी स्वतःची काळजी घेत जागरूक राहिले पाहिजे, प्रत्येकाने आप आपल्या गल्लीचा ग्रुप तयार करून रात्रीच्या वेळेस गस्त घालावी, नवीन व्यक्तीच्या भाषा व हालचालीवर संशय आल्यास पोलीस स्टेशनला कळवून सहकार्य करावे.
विशाल रोचकरी अध्यक्ष श्री तुळजाभवानी प्रक्षाळ मंडळ
.jpeg)