तुळजापूर प्रतिनिधी
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या उस्मानाबाद जिल्हा सहसचिवपदी काक्रंबा येथील युवा तरुण सत्यजित तुकाराम साठे यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप खंडापूरकर यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश मुख्य कार्यकारी अध्यक्ष धैर्यशील कापसे यांच्या हस्ते तुळजापूर येथे बैठकीत करण्यात आले.
सर्वसामान्यांचे प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून जिल्ह्यात संघटनेचे कार्य वाढवून सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी गोरगरीब जनतेच्या न्यायासाठी सतत प्रयत्नशील राहून सहकार्य करावे असे नियुक्ती पत्रकात नमूद केले आहे. तर संघटनेच्या माध्यमातून कोणावर ही अन्याय होऊ देणार नसल्याचे यावेळी सत्यजित साठे यांनी यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी प्रमुख पाहुणे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटना महाराष्ट्र प्रदेश मुख्य कार्यकारी अध्यक्ष धैर्यशील आबासाहेब कापसे, स्वराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश गवळी, अ.भा.भ.नि. जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, शहराध्यक्ष निखिल अमृतराव सह मित्र परिवार उपस्थित होते.
