कामाचे कौतुक केले पाहिजे : आ. राणाजगजीतसिंह पाटील विकास कामासाठी 1650 कोटीची दोन नवीन टेंडर

mhcitynews
0

तुळजापूर  प्रतिनिधी 

नगरपरिषद परिक्षेत्रात विशिष्ट नागरिक सेवा व सुविधा पुरवणे योजनेअंतर्गत बारा कोटींची विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा दिनांक 14 ऑगस्ट रोजी सायं 7 वाजता शिंदे प्लॉटिंग येथे लोकनेते जिल्ह्याचे विकासरत्न आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या शुभहस्ते काॅनसीलाचे अनावरण करून भूमिपूजन करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला उपस्थित मान्यवरांनी माजी सैनिकांचे शाल हार देऊन सन्मान केले.

यावेळी व्यासपीठावर तेरणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुरेश देशमुख भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, नेताजी पाटील, युवा नेते विनोद गंगणे, मा. नगराध्यक्ष सचिन रोचकरी, अनिल काळे, बाळासाहेब शिंदे, संतोष बोबडे, नारायण नन्नवरे, सचिन पाटील, उपस्थित होते. प्रसंगी  शहरातील जेष्ठ स्थानिक नागरिक जेवडीकर यांच्या हस्ते आ. राणाजगजीतसिंह पाटील यांचा वृक्षरोप व बुके देऊन स्वागत केले. तर उपस्थित सर्व मान्यवरांचे हि जेष्ठ नागरिकांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार पाटील मनाली की, शहरात होत असलेल्या विविध विकास कामाचे नागरिकांनीही कौतुक केले पाहिजे तुळजापूर शहर, मंदिर परिसर विकास कामासाठी गेल्या दहा दिवसापूर्वीच दोन नवीन टेंडर निघाल्याची माहिती देताना 1500 कोटी मंदिर शहर परिसर विकास व भवानी तलवार भव्य पुतळा उभा करण्यासाठी 150 कोटीची टेंडर निघाल्याची माहिती दिली. तुळजापूर सोलापूर रेल्वे साठी 544 कोटी रुपये आपल्या सरकारने मंजूर केले असून हे काम 30 महिन्यात पूर्ण होणार आहे असे राणा दादा यांनी सांगितले. 2020 मध्ये पिक विमा मिळण्यासाठी उच्च न्यायालयात जावे लागले ते प्रकरण अजून चालू असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले. एका वर्षभरात  भविष्यात तीन कोटी भाविक शहरात येतील ज्यांनी शहराच्या अर्थकारण सुधारेल असे नियोजन करू असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रसंगी नगरीचे मा. नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी प्रास्ताविक भाषनात गेल्या पंधरा वर्षातील केलेल्या विकास कामाचा आराखड्या बाबत माहिती दिली. गेल्या दोन वर्षातील निधी पाहता आ. राणा दादांनी शहरासाठी सर्वात जास्त निधी दिल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके, भाजपचे शहराध्यक्ष शांताराम पेंदे, नागेश नाईक, पंडितराव जगदाळे, अमर हंगरेकर, अविनाश गंगणे, माऊली भोसले,गुलचंद व्यवहारे, शिवाजी बोधले, किशोर साठे, सचिन रसाळ, बाळासाहेब भोसले, सुहास गायकवाड, प्रदीप भोसले, लखन पेंदे, सचिन कदम, राम चोपदार, रामचंद्र रोचकरी, निलेश रोचकरी, दिनेश बागल, राजेश्वर कदम, नानासाहेब डोंगरे,  प्रसाद पानपुडे, सागर पारडे, इंद्रजीत साळुंके,सचिन कदम यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मैंदर्गी यांनी केले तर आभार पंडितराव जगदाळे यांनी मानले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top