नगर परिषदे येथे राष्ट्रीय ध्वज विक्री स्टाँल अभियान चालु

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

"हर घर तिरंगा या उपक्रमाची अंमलबजावणी सन २०२२-२३ मध्ये अतिशय यशस्वी प्रकारे करण्यात आली होती. अनेक कोटी लोकांनी आपल्या स्वतःच्या घरावर तिरंगा झेंडा फडकाविला होता. तसेच ६ कोटी लोकांनी दिलेल्या वेबसाईटवर सेल्फी दुईथ तिरंगा अपलोड केले होते. त्याचप्रमाणे याही वर्षी म्हणजेच दि. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था यांच्या कार्यालयांवर राष्ट्रध्वजाची उभारणी करण्याबाबतचा कार्यक्रम यशस्वीपणे राबवायचा असल्याने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (75) अंतर्गत नगर परिषदे येथे राष्ट्रीय ध्वज विक्री स्टाँल अभियान चालु केले यावेळी माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, नगरपरिषद कर्मचारी सज्जन गायकवाड,मुजफ्फर शेख उपस्थित होते. तुळजापूर शहवासियांनी राष्ट्रीय ध्वज घेऊन आपल्या घरा वरती उंच ठिकाणी १५ आँगस्ट रोजी उभा करून या राष्ट्रीय अभियानात सहभाग नोंदवावा. सदर उपक्रमाचे उदेश स्वातंत्र्याचा लढा आणि स्वातंत्र्योत्तर काळात देशाने गाठलेले प्रगतीचे टप्पे याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, देशभक्तीची भावना निर्माण करणे आणि भारत देश घडविणाऱ्या महान व्यक्तींची आठवण करणे असे आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top