राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष पदी नितीन रोचकरी यांची निवड

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या तुळजापूर तालुकाध्यक्ष पदी येथील नितीन रोचकरी यांची जिल्हा कार्यालय धाराशिव येथे सोमवार दि. 02 रोजी आयोजित बैठकीत निवड करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या उपस्थितीत युवक जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे यांच्या हस्ते नूतन नवनियुक्त पदाधिकारी यांचा नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले. येत्या काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या माध्यमातून पक्ष संघटना मजबुतीने उभी कराल असे नियुक्तीपत्रात केले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top