धाराशिव जिल्हा होमगार्ड कार्यालयातील पथक स्तरावरील रिक्त मानसेवी पदावर पदोन्नतीस सेवा जेष्ठता व पात्रता नुसार पात्र ठरत असलेल्या होमगार्ड मानसेवी अधिकारी यांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अप्पर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक होमगार्ड धाराशिव श्री गौहर हसन यांनी आदेश काढत तुळजापूर येथील पथकातील मानसेवी अधिकारी म्हणून पदोन्नती देऊन गौरविण्यात आले आहे.
तुळजापूर पथकातील पलटण नायक म्हणून कार्यरत असलेले रणजित रोकडे यांना कंपनी नायक, सार्जंट म्हणून कार्यरत असलेले श्रीकांत मंडोळे यांना वरिष्ठ कंपनी नायक तर होमगार्ड म्हणून कार्यरत असलेले राघव गायकवाड, महादेव सोनवणे, श्रीमती बागवान पलटण नायक म्हणुन पदोन्नती देण्यात आली.
तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या हस्ते तुळजापुर पोलीस ठाणे येथे होमगार्ड कर्मचारी यांना त्यांच्या रँक लावण्यात आल्या.
