शहरातील समर्थ नगर येथील सखी सहेली महिला बचत गटाचा हळदि कुंकू कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी महिलांनी रांगोळीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
शिंदे प्लाॅटींग, तुळजापूर खुर्द येथील समर्थ नगर येथील सखी सहेली महिला बचत गटाच्या हळदी कुंकू कार्यक्रमाला शहरातील शेकडो महिलांनी भेट दिली. यावेळी आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. रांगोळीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अश्विनी शेटे, सुजाता काठेवाड, पुणम कदम, स्वाती सुरवसे, लता बनकर, शुभांगी डोके, दुर्गा डोके, वर्षा माहुले, ज्योती माहुले, विजयालक्ष्मी काटे, मेनका भोसले, अर्चना खुंटाफळे, सिमा चव्हाण, वैशाली शिंदे आदी महिलांनी परीश्रम घेतले.
