नरेश काका अमृतराव व औदुंबर दादा कदम मित्र परिवाराच्या वतीने पत्रकारांचा सन्मान व दिनदर्शिकेचे प्रकाशन

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

स्थानिक, जिल्हा, राज्य, देश तसेच जागतिक पातळीवरील समस्या आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या व रचनात्मक उपक्रमांना यथायोग्य प्रसिद्धी देणाऱ्या, लोकशाहीचा वैचारिक कणा तसेच चौथा स्तंभ असलेल्या तुळजापूर शहरातील पत्रकार बांधवांचा नरेश काका अमृतराव व औदुंबर दादा कदम मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आ.राणाजगजीतसिंह पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व विनोद(पिटू भैय्या)गंगणे यांच्या नेतृत्त्वाखाली दिनदर्शिकेचे प्रकाशन उपस्थित पत्रकार बांधवांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मा नगराध्यक्ष सचिन रोचकरी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन पाटील, माजी नगरसेवक पंडितराव जगदाळे, औदुंबर कदम, विजय कंदले, शांताराम पेंदे, शिवाजी बोधले, निलेश रोचकरी, लखन पेंदे, आनंद कंदले, राम चोपदार, सागर पारडे सह मित्र परिवार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top