तुळजापूर प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाच्या जिल्हा सचिव पदी फिरोज भाई पठाण यांची निवड प्रदेशउपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे, गोकुळ तात्या शिंदे शफी भाई शेख सरडे काका यांच्या हस्ते निवड करत पत्र देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हा अध्यक्ष दिग्विजय शिंदे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असद भाई पठाण , मलंग भाई शेख ज्येष्ठ नेते मसुते काका नवनिर्वाचित नळदृग शहराचे शहराध्यक्ष अजित अण्णा जुनेदी तुळजापूर राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष नितीन रोचकरी राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंखे व जिल्ह्यातील व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्वांनी फिरोज भाई पठाण यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.