तुळजापूर प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे(अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेचे सहकुटुंब दर्शन घेत सर्वसामान्य जनतेच्या व बळीराजाच्या जीवनात सुख,शांती, समृद्धी नांदो अशी प्रार्थना आई तुळजाभवानी चरणी केली. यावेळी तटकरे यांच्या पत्नी वरदा, चिरंजीव आमदार अनिकेत तटकरे, स्नुषा आदी उपस्थित होते.
दर्शनानंतर तटकरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून तसेच मंदिर संस्थानकडून यथोचित सत्कार करण्यात आला. मंदिर समितीतर्फे त्यांचा शाल व तुळजाभवानी देवीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, प्रदेश सचिव गोकुळ शिंदे, पक्षाच्या पदवीधर विभागाचे कार्याध्यक्ष नितीन बागल, जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, तुळजापूर तालुका अध्यक्ष बबलू सूर्यवंशी, तालुका कार्याध्यक्ष संदीप गंगणे, दुर्गेश साळुंखे, पुजारी अविनाश गंगणे व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

