तुळजापूर प्रतिनिधी
शुक्रवार दि.०९ रोजी सकाळी धाराशीव जिल्हा शिवसेनेच्यावतीने श्री तुळजाभवानी मातेची यथोचित पुजाअर्चा करून महाआरती करण्यात आली.जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम, उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख सुरज कोठावळे,उपतालुकाप्रमुख खंडू कुंभार,सोशल मिडियाप्रमुख संतोष दुधभाते,जेष्ठ शिवसैनिक मनोज भाई मिश्रा,नंदगाव विभागप्रमुख मारूती बनसोडे,अनिल खोपळे,दिनेश कदम,कैलास कदम,संजय कदम,रोहित कदम,अभिषेक कदम,स्वराज कदम,अभिजीत पाटिल,सह अनेक शिवसैनिक हजर होते.
