Swarajya Party's blood donation camp | स्वराज्य पक्षाच्या रक्तदान शिबिरात 53 रक्तदात्यांचे रक्तदान

mhcitynews
0
रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना उपस्थित मान्यवर
तुळजापूर प्रतिनिधी 

स्वराज्य प्रमुख युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त स्वराज्य पक्षाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला 53 जणांनी रक्त देऊन मोलाचे योगदान दिले. या कार्यक्रमाचे उद्घाटन सुभेदार तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज  सुभेदार कुणाल मालुसरे यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मराठवाडा प्रवक्ते जीवन इंगळे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके, स्वराज्य पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य आबासाहेब कापसे , स्वराज्य पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत अपराध, स्वराज्य पक्ष बीड जिल्हा निमंत्रक सुरज जायभाय, सोलापूर शहर उपप्रमुख  परमेश्वर सावंत, सोलापूर जिल्हा उपप्रमुख  संतोष जाधव, बार्शी तालुकाध्यक्ष सुरज आवारे, सोलापूर जिल्हा उपप्रमुख शामराव डिसले, पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष सचिन ताकमोघे हे मान्यवर उपस्थित होते. 


स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी राजे यांचा  जन्मदिवस लोकाभिमुख कार्यक्रमांनी स्वराज्य पक्षाच्या वतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला  प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी, विधीतज्ञ मंडळाचे माजी अध्यक्ष दादासाहेब सोंजी, माजी नगरसेवक राहुल खपले, पत्रकार श्रीकांत कदम, प्रदीप अमृतराव, सुरज बागल यांनी भेट देऊन व रक्तदान करून शुभेच्छा दिल्या या सर्व मान्यवरांचा स्वराज्य पक्षाच्या वतीने पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी स्वराज्य जिल्हाप्रमुख महेश गवळी, अजय साळुंके, प्रशांत सोंजी ,कुमार टोले सत्यजित साठे, प्रसाद मुळे, रोहन देशमुख, बालाजी जाधव, गणेश पाटील, विश्वास मगर, प्रशांत उकरंडे , सारंग कानडे, सचिन काटकर, व्यापारी शिवानंद शिंदे, गणेश साठे. यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top