Lecture series on Gender Equality by Law Student at Dharashiv Prashala | विधी विद्यार्थ्यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम धाराशिव प्रशालेत संपन्न...
mhcitynews
2/01/2024 11:13:00 pm
0
धाराशिव प्रतिनिधी
डॉ.बापुजी
साळुंखे विधी महाविद्यालय व स्वीसेड संस्था,आयएलएस विधी महाविद्यालय,पुणे यांच्या
संयुक्त विद्यमाने कार्यरत असणारा “ निर्धार समानतेचा ” या कार्यक्रमांतर्गत धाराशिव
प्रशाला,धाराशिव येथे व्याख्यानमाला संपन्न झाली. या व्याख्यानमालेचा उद्देश्य समाजात असणारी असमानता दूर करून समाजात समानता कशी रुजवता
येईल यासाठी कु.सानिया शेख हिने लिंगभाव समानता यावर मार्गदर्शन केले तर कु. ऋतुजा
बिराजदार ने घरगुती हिंसाचार कसा कमी करता येईल यावर विचार व्यक्त केले; तर कु.भाग्यश्री वाघ हिने कौटुंबिक हिंसाचारावर
कविता सादर केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.
पंडित जाधव होते, तर प्रमुख उपस्थिती डॉ. संजय आंबेकर,
श्री. मोहन सुरवसे यांची होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठीसुदर्शन
ढोबळे, जयराज शिंदे, सर्वेश आंबेकर यांनी प्रयत्न केले,तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पूजा ढेकणे तर आभार कु. बालाजी गुरव यांनी व्यक्त केले..