धाराशिव प्रतिनिधी
डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय व हॅलो मेडिकल फाउंडेशन, अणदूर यांच्या संयुक्त विद्यमाने रन फॉर इक्वलिटी रॅलीचे बुधवार दि. 1 रोजी आयोजन करण्यात आले होते.
“हिंसामुक्त गाव हिंसामुक्त कुटुंब”ब्रीद वाक्य घेत रॅली शहराच्या मध्यवर्ती भागातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांस पुष्पहार घालून अभिवादन करत जिल्हाधिकारी कार्यालयात येथे पोहोचली.
प्रसंगी रॅलीची सुरुवात हॅलोचे प्रकल्प समन्वयक बसवराज नरे यांनी हिरवा झेंडा दाखवून केले. रॅलीत सहभागींनी निर्धार समानतेबाबत विविध घोषणा देत हिंसाचार विरोधात जनजागृती केली. जिल्हाधिकारी कार्यालय येथे रॅली आली असता स्वागत करून
उपजिल्हाधिकारी राजकुमार माने यांनी रॅलीतील सहभागी विद्यार्थ्यांना हिंसाचार विरोधात मार्गदर्शन केले. त्यानंतर अधिकाऱ्यांना विधी महाविद्यालयाने तयार केलेले‘निर्धार समानतेचा’या प्रकल्पाचे बुकलेट देऊन रॅलीची सांगता करण्यात आली.
यावेळी डॉ. वैजनाथ शिंदे, प्र. प्राचार्य, डॉ. संजय आंबेकर- प्रकल्प समन्वयक व लीगल एड क्लिनिक, प्रा.कैलास शिकारे- सहाय्यक प्रकल्प समन्वयक, डॉ .नितीन कुंभार, डॉ. इक्बाल शाह, डॉ. स्मिता कोल्हे, डॉ. पौर्णिमा दागडिया, प्रा. चंदानी घोगरे, प्रा. अजित शिंदे, प्रा. सोनाली पाटील, संभाजी बागल, डॉ. लक्ष्मणराव भरगंडे, दिलीप लोकरे , हॅलोचे सतीश कदम, स्वाती पाटील, ज्ञानेश्वर कदम, श्रीराम जाधव, वासंती मुळे, नागिणी सुरवसे, वैजनाथ लोहार सह विधी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
