धाराशिव प्रतिनिधी
नागनाथ निवासी मतिमंद विद्यालय खानापूर व भारतीय पुनर्वसन परिषद नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे तिन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन आयोजित केले असून,धाराशिव जिल्ह्यातील हा पहिलाच सीआर ए प्रोग्राम आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार दि. 22 रोजी कार्यक्रमाचे उद्घाटन नवजीवन अपंग प्रशिक्षन केंद्राचे प्राचार्य श्री पी.एन.जाधव साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हरीयाणा येथुन आलेले डॉ.सैनी सर व श्री.तुषार भालेराव सर उपस्थित होते.
बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांचे अडथळे समस्या व त्यावर उपचार या विषयावर श्री नितीन पडवळ सर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत महाराष्ट्रातून विशेष शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रम तीन दिवस असून 24 तारखेला समारोप होईल.
